Mary Millben US funding claim on CJP : केंद्रातील भाजप मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर देशात अभिजित दिपके यांची ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे उपहासात्मक आंदोलन चर्चेत आले. आता SIRच्या मुद्यावरून ‘कॉकरोच’ पुन्हा आक्रमक झाली आहे.
अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी ज्यापद्धतीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, त्यामुळे त्यांच्यामागील ताकद, आर्थिक ताकद चर्चेत आहे. यातच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मिळणाऱ्या देणगीबाबत खळबळजनक दावा केला आहे.
मेरी मिलबेन यांनी अमेरिकेतून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (CJP) देणगीदारांकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ला अमेरिकेतील देणगीदारांकडून निधी पुरवला जात आहे, असे म्हणत, आता गप्प बसण्याची वेळ नाही, असे म्हणत त्यांनी भारतातील सर्व ‘तरुण देशभक्तांना’ पुढे येण्याचे आणि या संघटनेच्या विघातक वृत्तीविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलनाचे आवाहन केले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांचे समर्थक आणि 'कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) समर्थक नवी दिल्लीत आंदोलन करत असताना मिलबेन यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
मेरी मिलबेन यांच्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्या अमेरिकी देणगीदारांकडून अभिजीत दिपके आणि त्यांच्या पार्टीला आर्थिक मदत केली जात आहे. भारतातील व्यवस्था खिळखिळी करण्याचा या लोकांचा उद्देश असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारताच्या विकासात अडथळे निर्माण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात असल्याचे सांगत, त्यामुळे सावध राहा, असेही मेरी मिलबेन यांनी म्हटले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ला परदेशातून मिळणाऱ्या देणगींच्या नावामध्ये, जॉर्ज सोरोस किंवा एलोन मस्क यांच्यासारख्या नावे समोर येतात. आता अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला मिळणाऱ्या देणग्यांबाबत अमेरिकेचा उल्लेख केल्याने देशात चर्चांना तोंड फुटले आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची अधिकृत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे पक्षाकडे कोणत्या मार्गाने निधी येतो, याबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.