

Nanded political news : नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील भाजपचे आमदार तुषार राठोड यांची दिल्लीकडे वाटचाल व्हावी, अशा शुभेच्छा खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली असतानाच, त्यांना मात्र राज्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत.
मंत्रिपदाच्या प्रश्नावर त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय करतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुखेड येथे आयोजित साईबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रम झाला. खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर या नेत्यांची धार्मिक कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रगंली होती. या कार्यक्रमानिमित्ताने चव्हाण आणि चिखलीकर यांनी आमदार तुषार राठोड यांना थेट दिल्ली दर्शन घडविले. पण आमदार तुषार पाटील यांनी राज्यातच थांबवण्याचा निर्धार करत, थेट मंत्रिपदाला गवसणी घालण्याची इच्छा बोलावून दाखवली. आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोपावली.
आमदार चिखलीकर यांनी खासदारकीचा विषय छेडत, माझ्यावतीने राठोड यांना पूर्णपणे शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळात आमदार तुषार राठोड खासदार व्हावेत, अशा शुभेच्छा आहेत, असे म्हटले. यानंतर खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील तोच धागा पकडत, शुभेच्छा दिल्या. चांगल काम करा. ईश्वर तुमच्यासोबत आहे, आमदार होणार की, खासदार होणार की, आणखी काही होणार, हे साईबाबा ठरवतील, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. तुषार राठोड यांची इच्छा काय आहे मला माहित आहे. साईबाबा जे ठरवतील ते आम्ही मान्य करू, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
नेते चव्हाण आणि चिखलीकर यांनी, खासदारकीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, यावर मला काय करायचे ही साईबाबांची इच्छा आहे. कोण काय होईल हे जनता मतदार ठरवतात. माझ्या कामाकडे बघून मतदार मला कामाची पावती देतील, असे तुषार राठोड यांनी म्हटले.
जिल्ह्याला मंत्रीपद नाही. लालदिवा कधी मिळणार असे विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की, 'श्रद्धा आणि सबुरी', पक्षावर, नेत्यावर श्रध्दा ठेवा आणि मनामध्ये सबुरी बाळगा. मुख्यमंत्री आणि साईबाबा यांच्यावर विश्वास आहे, ते न्याय करतील, अशी स्मितहास्य करत आमदार तुषार राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. यानिमित्ताने राज्यमंत्री पदाबाबतची त्यांची इच्छा लपून राहिली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.