Colombia Plane Crash : कोलंबियाच्या हवाई दलाच्या विमानाचा भयानक अपघात झाला आहे. या अपघातात हवाई दलाच्या हर्क्युलस सी-१३० विमानातील जवळपास ६६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या विमानात एकूण १२१ जवान आणि क्रू सदस्य होते.
तर हवाई दलाच्या हर्क्युलस सी-१३० विमानाने उड्डाण केल्यानंतर ते थोड्याच वेळात कोसळल्याची माहिती प्युएर्तो लेगुइझामो शहराच्या उपमहापौर कार्लोस यांनी दिली आहे. तर ही दुर्घटना पुटुमायो ॲमेझॉन प्रांतात इक्वेडोर आणि पेरूच्या सीमेवर असलेल्या प्युएर्तो लेगुइझामो येथे घडली आहे.
दरम्यान, संरक्षक मंत्री पेद्रो सांचेज यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी हे विमानातून सैनिक एका ठिकाणावरुन सैनिक दुसऱ्या ठिकाणी जात असताना ही घटना घडल्याचं सांगितलं आहे.
तर कोलंबिया हवाई दलाने सांगितलं की, अपघातग्रस्त हर्क्युलस सी-१३० विमानात ११० सैनिक आणि ११ कर्मचाऱ्यांसह एकूण १२१ जण प्रवास करत होते. अपघातातून ७७ जणांना सुखरुप बाहेर काढल्याची आणि जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती गिली आहे.
तसंच या अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचेही हवाई दलाने म्हटंलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोलंबिया हवाई दलाचं अपघातग्रस्त विमान हर्क्युलस सी-१३० विमान हे अमेरिकेने २०२० मध्ये दान केल्याची माहिती हवाई दलाच्या तज्ज्ञांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.