

US Iran War Update : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली आणि संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला. मात्र, ट्रम्प यांची ही घोषणा म्हणजे अमेरिकेची अमेरिकेची माघार असल्याचं इराणने म्हटलं आहे.
त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील वाद पुन्हा ५ दिवसांनी उफाळून येणार की काय? याची चिंता सर्वांना लागली होती. मात्र, आता एक सुखद आणि संपूर्ण जगासाठी आनंदी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानच्याऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच काही तासांनी त्यांनी थेट युद्ध संपवण्याची तारीख देखील जाहीर केली आहे.
याबाबतची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली असून या माध्यमांच्या दाव्यानुसार अमेरिकेने युद्ध थांबण्यासाठी ९ एप्रिल ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे जवळपास मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेलं इस्राइल-अमेरिका विरूद्ध इराणमधील यु्द्ध थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. युद्धावर पूर्ण तोडगा यातून निघेल. ही चर्चा आठवडाभर चालेल,’ असा दावा केला आहे. मात्र, इराणमध्ये कोणाशी चर्चा केली गेली, याची माहिती त्यांनी दिली नाही. शिवाय इराणने अमेरिकेशी चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळलं आहे.
अमेरिकेने इराणला ४८ तासांची मुदत दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद करू, असा इशारा दिला होता. यासह पश्चिम आशियातील वीज प्रकल्प आणि पर्शियन आखातातील खाणींना लक्ष्य करू असंही इराणने म्हटलं होतं. इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेने माघार घेतल्याचा दावा इराणमधील सरकारी माध्यमांनी केला आहे.
त्यामुळे एकीकडे धमकीची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना इराणने चांगलंच मेटाकुटीला आणल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय इराणच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर हल्ला न करण्याबाबत पाच दिवसांची एकतर्फी वाढ केली आहे. अशातच आता यु्द्ध थांबवण्याची तारीखच अमेरिकेने दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण जग घोघांवणारं संकट ९ एप्रिलला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.