Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी (3 एप्रिल) दोन वर्षांच्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत. राहुल गांधींना (Rahul Gandhi) पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी सत्र न्यायालयात पोहचल्या आहेत. राहुल गांधींची संपूर्ण कायदेशीर टीम शिक्षेला स्थगिती देण्यासाठी युक्तिवाद करणार आहे.
राहुल गांधींना जामीन मिळणार की त्यांना शिक्षा होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही परिस्थितींसाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळेच काँग्रेसचे स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचे नेते न्यायालयात हजर राहणार आहेत. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी तसेच राजस्थानचे काँग्रेसचे अशोक गेहलोत, छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे तीन मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.यासोबतच राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सुरतमध्येच राहणार आहेत.
13 एप्रिल 2019 रोजी, कोलार, कर्नाटक येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधींनी एका सभेत मोदी आडनावाबाबत विधान केले. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे, असे गांधींनी म्हटले होते. या प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार आणि गुजरात सरकारचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाख दिवशी म्हणजे २४ मार्च रोजी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
आज कोर्टात काय होणार?
राहुल गांधी यांची कायदेशीर टीम सीजेएम न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सकाळी ११ वाजता सत्र न्यायालयात अपील आणि जामीन अर्ज दाखल करणार आहे.
दुपारच्या जेवणानंतर सुरत जिल्हा न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दुपारी 2 वाजता याचिकेवर सुनावणी होईल.
राहुल गांधी दुपारी 2 वाजता सुरत न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी नियमित जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.
राहुल गांधी यांच्या कायदेशीर टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी करणार आहेत. सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयातील त्रुटींकडे आम्ही लक्ष वेधण्याच प्रयत्न करणार आहोत.याचा निर्णय़ लवकरच लागेल असा आम्हाला विश्वास असल्याचे मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.