BJP Vs Congress News : राहुल गांधीवरील कारवाईविरोधात पिंपरीतून कॉंग्रेस मोदींना पाठवणार एक लाख पत्र

Congress Protest : राहुल गांधींच्या समर्थनार्थ पिंपरीत काँग्रेसचे जेलभरो आंदोलन, आंदोलक दोनशे आणि पोलिसांच्या व्हॅन फक्त दोन...
BJP Vs Congress News
BJP Vs Congress News Sarkarnama

Pimpri Chinchwad News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसने २८ मार्चपासून शहरात जनआंदोलन सुरु केले आहे. त्यात शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तर रविवारी (दि.२) जेलभरो आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसच्या जेलभरो आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.आंदोलकांच्या मोठ्या संख्येच्या पोलिसांच्या फक्त दोनच व्हॅन होत्या. एकातून महिला व दुसऱ्या व्हॅनमधून पुरुष अशा हातावर मोजता येईल, इतक्याच आंदोलकांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यावर नेले. नंतर लगेचच त्यांना सोडूनही दिले.

BJP Vs Congress News
Uddhav Thackeray: ''शेंडी,जानव्यावाल्यांशीच तुमचा घरोबा,हे विसरू नका..''; 'या' नेत्यानं उद्धव ठाकरेंना सुनावलं

पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम,माजी महापौर कविचंद भाट, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी आदींचा त्यात समावेश होता.

तत्पूर्वी राहूल गांधीं(Rahul Gandhi)ची खासदारकी रद्द करणं हा लोकशाहीचा खून आहे असा हल्लाबोल कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी आंदोलनस्थळी केला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा आंदोलक देत होते.राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहरात काँग्रेसने सह्यांची मोहीमही सुरू आहे. त्याजोडीने ते शहरातून केंद्र सरकारच्या निषेधाची एक लाख पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठणार आहेत.

BJP Vs Congress News
Raju Shetti News : शेतकरी नेते राजू शेट्टींची मोठी घोषणा; म्हणाले, ''सर्वच पक्ष नालायक म्हणून...''

काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल खटल्यात कोर्टानं दोन वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी रद्द झाल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना १२ तुघलक रोड येथील बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लोकसभेच्या हौसिंग कमिटीने यासंदर्भात राहुल गांधींना नोटीस धाडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com