mukul wasnik 
देश

Rajya Sabha elections : काँग्रेसकडून मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रनजीत रंजन, हरयाणातून अजय मकेन, कर्नाटकमधून जयराम रमेश, मध्यप्रदेश विवेक तंखा, राजस्थानमधून तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून (congress) राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक (mukul wasnik) यांच्या सहीने रविवारी रात्री काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. (Rajya Sabha elections news)

मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढि यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी तर तामिळनाडू येथून पी. चिंदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रनजीत रंजन, हरयाणातून अजय मकेन, कर्नाटकमधून जयराम रमेश, मध्यप्रदेश विवेक तंखा, राजस्थानमधून तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार निवडून जाणार आहे. राज्यातील अनेक नेते या एका जागेसाठी इच्छुक होते. यावेळी बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस हायकामंडने पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मात्र हायकमांडच्या या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे.

इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. अल्पसंख्याकाला महाराष्ट्रामधून राज्यसभा उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी आग्रही असल्याचे समजते. पी.चिदंबरम यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT