Rajya Sabha elections bjp : विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट

अनिल बोंडे हे देवेंद्र फडणवीस गटातले असल्याने त्यांना संधी दिल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.
Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी मंत्री विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे. गेल्या काही दिवसापासून विनोद तावडे (vinod tawde) यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा होती, पण ऐनवेळी त्याचा पत्ता कट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विनोद तावडे यांना डावलून माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना भाजपने संधी दिली आहे. अनिल बोंडे हे देवेंद्र फडणवीस गटातले असल्याने त्यांना संधी दिल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. राज्यसभेसाठी (Rajya Sabha) भाजपकडून (BJP) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

Vinod Tawde
मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय : 'या' सहा धर्मांना मिळणार अल्पसंख्याक प्रमाणपत्र

काँग्रेसकडून यूपीचे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपकडून दोनच नावे जाहीर झाल्याने महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BJP announces Piyush Goyal, Anil Bonde and Congress announces Imran Pratapgadi)राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने दोनच उमेदवार दिले आहेत. त्यात सध्याचे केंद्रीय मंत्री गोयल आणि अमरावतीचे माजी मंत्री आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बोंडे यांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्येक एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. शिवाय शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार जाहीर झाल्याने राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com