Ashok Gehlot News Sarkarnama
देश

Ashok Gehlot : काँग्रेसने अशोक गहलोत यांना सोपवली 'ही' मोठी जबाबदारी!

Ajay Maken and Pratap Singh Bajwa : अजय माकन आणि प्रतापसिंह बाजवा यांनाही मिळाले आहे पद

Mayur Ratnaparkhe

Congress : Haryana Assembly election हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वरिष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये काँग्रेसने राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमधील आपल्या दिग्गज नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीयमंत्री अजय माकन आणि पंजाबचे वरिष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांना वरिष्ठ निरीक्षक बनवलं गेलं आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली गेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तत्काळ प्रभावाने अशोक गहलोत(Ashok Gehlot), अजय माकन आणि प्रताप बाजवा यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

याआधी अशोक गहलोत यांना लोकसभा निवडणुकीतही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली होती. त्यांना अमेठी लोकसभा मतदारसंघासाठी विशेष निरीक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या(BJP) दिग्गज नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करून, सर्वांनाच धक्का दिला.

तसेच राज्यसभा खासदार अजय माकन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक बनवलं गेलं होतं. त्याआधीही अजय माकन यांना अनेक राज्यांमध्ये निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली गेली होती. तर प्रतापसिंग बाजवा यांना हिमाचलप्रदेश निवडणुकीसाठी निरीक्षक बनवलं गेलं होतं. प्रतापसिंग बाजवा हे हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत.

हरियाणात उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता तेथे १६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसचे(Congress) वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हुड्डा ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तिथे त्यांचा मुकाबला ११ उमेदवारांशी होणार आहे. काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असल्याने, आता निवडणुकीच्या तयारीत कोणती कसर सोडणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस अशोक गहलोत, अजय माकन आणि बाजवा या तिन्ही दिग्गज नेत्यांना हरियाणात पाठवले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT