New Delhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जम्मू आणि काश्मीरमधील नेत्याला संधी दिली आहे. काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी याच राज्यातील नेत्याची निवड केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीव व जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यावर आता युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या बी. व्ही. श्रीनिवासह हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने राहुल गांधी यांनी नवीन अध्यक्षांचा शोध सुरू केला होता. त्यांनी काही प्रमुख युवा नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचे समजते.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत भानू यांच्यासह हरियाणातील नेते दिव्यांशू बुध्दिराजा यांचेही नाव आघाडीवर होते. तसेच अभिमन्यू पूनिया, गरीब दास आणि शशी कुमार यांच्यासह आठ नेत्यांचाही यामध्ये समावेश होता. अखेर राहुल यांनी चिब यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत काश्मीरमधील पदाधिकाऱ्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.