Arvind Kejriwal, Mohan Bhagwat
Arvind Kejriwal, Mohan BhagwatSarkarnama

Arvind Kejriwal : केजरीवालांचे मोहन भागवतांना जिव्हारी लागणारे पाच प्रश्न; RSS काय उत्तर देणार? 

AAP Mohan Bhagwat RSS BJP Janata Darbar : आपच्या वतीने दिल्लीत जंतरमंतर येथे आयोजित जनता दरबारमध्ये अरविंद केजरीवालांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली.
Published on

New Delhi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पाच प्रश्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबाबत हे प्रश्न आहेत.

दिल्लीत जंतरमंतरवर आपच्या जनता दरबारमध्ये केजरीवालांनी मोदींसह भाजपवर गंभीर आरोप केले. केजरीवाल म्हणाले, आरएएसवाले म्हणतात, आम्ही राष्ट्रवादी आहोत. मी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारू इच्छितो. ज्यापध्दतीने मोदीजी देशभरात ईडी, सीबीआयची धमकी देऊन इतर पक्ष तोडत आहेत, सरकार पाडत आहेत. हे देशासाठी योग्य आहे का? भारतीय लोकशाहीसाठी हे हानीकारक आहे, हे तुम्ही मानता का?, असा पहिला प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला.

Arvind Kejriwal, Mohan Bhagwat
Assembly Election 2024 : "...अन् तेव्हा भाजपसोबत राहिलो, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक," माजी उपमुख्यमंत्र्यांचं विधान

देशभरात सर्वात भ्रष्टाचारी नेत्यांनी मोदींनी आपल्या पक्षात घेतले. अशाप्रकारच्या राजकारणाशी तुम्ही सहमत आहात का, अशा भाजपची तुम्ही कधी कल्पना केली होती का?, असे सांगत केजरीवालांनी भागवतांना इतर पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशावर सवाल केला.

मोदींना चुकीच्या गोष्टी करण्याला भागवतांनी कधी विरोध केला का, असा तिसरा प्रश्न केजरीवालानी केला. तर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका विधानाचा आधार घेत केजरीवालांना चौथा प्रश्न केला. ते म्हणाले, जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला आता आरएएसची गरज नसल्याचे म्हटले होते. भाजपसाठी आरएसएस आईसमान आहे. पण आज मुलगा आईवर डोळे वटारत आहे. मुलगा एवढा मोठा झाला का? नड्डा यांच्या या विधानावर तुम्हाला दु:ख झाले नाही का?, असा जिव्हारी लागणारा प्रश्न केजरीवालांनी भागवतांना विचारला.

Arvind Kejriwal, Mohan Bhagwat
Pakistan News : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला ; 'POK'मधील अत्याचाराचा 'UNHRC'मध्ये झाला 'पर्दाफाश'

भाजपमध्ये 75 वर्ष झालेला नेता निवृत्त होईल, असा कायदा तुम्हीच केला होता. लालकृष्ण अडवाणींसह अनेकांना निवृत्त केला. आता अमित शाह म्हणत आहेत, हा नियम मोदींना लागू नसेल. जो नियम अडवाणींसाठी लागू झाला तो मोदींना लागू होणार नाही, याच्याशी तुम्ही सहमत आहात का?, असा पाचवा सवाल करत केजरीवालांनी भागवतांना कोंडीत पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com