New Delhi News: लोकसभेच्या 2024 निवडणुकीतील विजयासह नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची तिसरी टर्म सुरू केल्यानंतर भाजपचे मंत्री खासदार, आमदार हे 2029 तर सोडाच थेट 2047 पर्यंत काँग्रेस सत्तेत येणार नाही असा दावा करताना दिसून येत आहे. पण आता देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता समोर आली आहे. एवढंच नाही, तर लोकसभेचे विरोधी पक्षनेत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशाचे पंतप्रधानही होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.
मोदी-शाह जोडगोळी दिल्लीपासून गल्लीपर्यंत,ग्रामपंचायतपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अशा सर्वच पातळीवर भाजपच 'बॉस'राहील याची खबरदारी घेताना दिसून येत आहे. पण भाजपच्या याच महत्वाकांक्षेला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून वारंवार राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाविषयीचे वेगवेगळे दावे केले जातात. पण निवडणुकीतील निकालानंतर ते दावे फोल ठरल्याचंच आत्तापर्यंत दिसून आलं आहे.अशातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशाचे 100 टक्के पंतप्रधान होणार असा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान,हरयाणा, मध्य प्रदेश यांसह अनेक महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसला पराभवाचे धक्के सहन करावे लागले. विधानसभाच नव्हे,तर स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसला कमबॅक करताच आलं नसल्याचं अनेकदा दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बडे नेत्यांसह,पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अखेर पक्षांतराचा मार्ग निवडला. मात्र,आता धक्क्यावर धक्के सहन केलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेससाठी आशेचा किरण जागवणारी एक अपडेट समोर येत आहे.
ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी एका पॉडकास्टमध्ये सर्वात मोठी भविष्यवाणी केली आहे. अग्रवाल यांनी राहुल गांधी हे 100 टक्केच नाही तर 110 टक्के देशाचे पंतप्रधान होणार असा दावा केला आहे. अग्रवाल यांनी हा दावा करतानाच गांधी यांच्या जन्मकुंडलीतच हा राजयोग असल्याचं म्हटलं आहे. पण हा योग त्यांनी तत्काळ नसून सुमारे 10 वर्षांनी असल्याचं सांगितलं आहे.
राहुल गांधी पंतप्रधान (Prime Minister) होण्याचे योग हे अर्थात 2036 मध्ये असल्याचा अंदाज मनीष अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार दिसून येत आहे. 2036 या वर्षी राहुल गांधींसाठी संबंधित पंतप्रधानपदाचा राजयोग तयार होणार असल्याचंही ज्योतिषी अग्रवाल यांचा दावा आहे.राहुल गांधींच्या नेतृत्वाची खरी झलक 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
लोकसभेच्या 2014 ,2019 निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेससह विरोधकांचा निभाव लागला नव्हता. पण हाच स्ट्राईक रेट कायम राखण्याचा इरादा भाजपनं 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट करत मिशन '400 प्लस' ठरवलं होतं. पण या मिशनला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व हेवेदावे बाजूला ठेवत एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीनं सुरुंग लावला होता. त्यानंतर लोकसभेत विरोधकांचा आव्वाज चांगलाच वाढला. त्यात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर असून मोदी सरकारला घेरण्याची ते एकही संधी सोडत नाही.
मनिष अग्रवाल यांनी याच पॉडकास्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाहांबाबतही मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी शहांचा पुढच्या 10 वर्षांत सत्ता आणि राजकारणातील दबदबा कायम राहणार असल्याचं सांगितलं. पण शाह यांचा प्रभाव देशाच्या आणि भाजपच्या राजकारणातून ओसरण्यास सुरुवात होईल त्याचवेळी राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रह चमकण्यास सुरुवात होईल. त्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचा दावाही ज्योतिषी अग्रवाल यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.