BJP and Congress
BJP and Congress  Sarkarnama
देश

उत्तरनंतर आणखी एका मतदारसंघात काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा भाजपला दे धक्का!

सरकारनामा ब्युरो

राजनंदगाव : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या (Congress) जयश्री पाटील यांनी विजय मिळवला आहे. यानंतर आता छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजयाकडे वाटचाल केली आहे. खैरागड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा यांनी भाजपच्या (BJP) कोमल जांघेल यांच्यावर 15 हजार 633 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अजून तीन फेऱ्या बाकी असून, वर्मा यांच्या विजय निश्चित मानला जात आहे. (By-Election News Updates)

जनता काँग्रेसचे छत्तीसगड (जोगी) पक्षाचे आमदार देवव्रतसिंह यांच्या मृत्यूमुळे खैरागड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी भाजपच्या माजी आमदार कोमल जांघेल यांच्यावर 15 हजार 633 मतांनी आघाडी घेतली आहे. वर्मा यांनी 15 व्या फेरीअखेर ही आघाडी घेतली आहे. आणखी तीन फेऱ्या बाकी असल्या तरी वर्मा यांनी निर्णायक आघाडी आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपच्या जांघेल या केवळ 870 मतांनी हरल्या होत्या.

नक्षलग्रस्त राजनंदगाव जिल्ह्यात खैरागड हा मतदारसंघ आहे. या पोटनिवडणुकीत 77.88 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वर्मा आणि जांघेल या दोघीही ओबीसी समाजातील आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. याला अखेर यश मिळाल्याचे दिसत आहे.

उत्तरमध्ये पुन्हा काँग्रेसचाच विजय

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT