मुझफ्फरनगर : विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) आणखी धक्का बसला आहे. बिहारमध्ये (Bihar) भाजप सत्तेत असून, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. (By-Election News Updates)
दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
विकासशील इन्सान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूमुळे बोचहां मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बेबी कुमारी यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात आरजेडीने अमरकुमार पासवान यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत 59.20 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 90 हजार 544 मतदारांनी मतदान केले होते. या पोटनिवणुकीत तीन महिलांसह 13 उमेदवार रिंगणात होते.
बालीगंजमध्येही भाजपचा पराभव
पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत. सुप्रियो यांना 20 हजार 38 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 50 हजार 722 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे. अजून फक्त एक फेरी बाकी असून, सुप्रियो यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता आमदारकी असा उलटा प्रवास सुप्रियो यांच्या निमित्ताने बंगालच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.