Karnataka CM Decision
Karnataka CM Decision Sarkarnama
देश

Karnataka CM Decision : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस मुख्य प्रवक्ते सुरजेवालांचं मोठं विधान!

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार, यावर गेल्या चार दिवसापासून चर्चा सुरु होती, या चर्चेवर अजूनही चर्चा घडून येत आहे. मात्र सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये काँग्रेस्चया अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार (D. K. Shivkumar) आणि सिद्धरामय्या हे दोघे स्पर्धेत आहेत . याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक देखील झाली.

दरम्यान काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randip Surajewala) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जाहीर करतील. जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असलेल्या बातम्या आणि अफवांकडे लक्ष देऊ नका. आमचे नेते खर्गेच याबाबत अंतिम घोषणा करतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT