Insurance Scam Case : सत्यपाल मलिकांच्या निकटवर्तीयांवर CBI चा छापा; मीडिया सल्लागार, स्वीय सहायकांच्या..

Insurance Scam Case Satyapal Malik News : जम्मू-काश्मिर आणि दिल्ली येथील एकूण नऊ ठिकाणी सीबीआयने आज छापेमारी केली.
Satyapal Malik
Satyapal Malik Sarkarnama

Insurance Scam Case Satyapal Malik News : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आज (बुधवार) विमा गैरव्यवहार प्रकरणात जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या चौकशीनंतर त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापेमारी सुरु केली आहे. मलिक यांच्याशी संबंधीत जम्मू-काश्मिर आणि दिल्ली येथील एकूण नऊ ठिकाणी सीबीआयने आज छापेमारी केली.

यात मलिक यांचे मीडिया सल्लागार सुनक बाली यांच्या घराचाही समावेश आहे. सत्यपाल मलिक यांचे स्वीय सहायक राहिलेले कंवर राणा यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आहे. तेथे कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. विमा घोटाळा प्रकरणात सीबीआयने सत्यपाल मलिक यांना देखील या प्रकरणी काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे.

Satyapal Malik
DK Shivakumar News : कर्नाटकाच्या CM पदावर दावा सांगणाऱ्या डी.के. शिवकुमारांबाबत मोठी बातमी ; सुप्रीम कोर्टानं..

सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मिरचे राज्यपाल असतानाचे हे प्रकरण आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबतचा हा विषय आहे. ते राज्यपाल असताना त्यांना दोन फायली निकाली काढण्यासाठी तीनशे कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती.

मलिक यांनीच या गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. तपास यंत्रणेने नुकतेच सत्यपाल मलिक यांचे जबाबही नोंदवले होते.

त्यातली एक फाईल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप मेडिकल इंशुरन्सशी निगडीत होती, तर दुसरी किरू जलविद्युत प्रकल्पासंदर्भातली होती. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक या दोन फाईल्स पास करू इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे.

Satyapal Malik
Decision Over Karnataka CM: कर्नाटक CM च्या घोषणेस उशीर का ? ; काँग्रेसने दिली भाजपची दोन उदाहरणे..

काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. यात त्यांनी काश्मिरमधल्या या घोटाळ्याचा उल्लेखही केला होता, तसंच पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराविषयी फारसा तिटकारा नाही, असे विधान केले होते. याआधी ऑक्टोबर 2022 मध्येही सीबीआयनं सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

एका कार्यक्रमात मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाचेही नाव घेतले होते. गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील झुंझुनू येथे एका सत्कार समारंभात त्यांनी याचा उल्लेख केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) एक पदाधिकारीही विमा व्यवहारात सहभागी असल्याचे त म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com