CM Satheesan Meet PM Modi  sarkarnama
देश

CM Satheesan Meet PM Modi : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; म्हणाले, '१,०३,५०० कोटी रुपयांच्या...'

Congress Keral CM Satheesan Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळचे मुख्यमंत्री सी डी सतीशन यांनी भेट घेतली. या भेटीविषयी सतीशन यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.

Roshan More

CM Satheesan News : काँग्रेसचे केरळचे मुख्यमंत्री सी डी सतीशन यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीविषयी सतीशन यांनी आपल्या सोशल मीडियातून माहिती दिली. सतीशन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केरळच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या गरजा मांडल्या. आणि राज्यातील महत्त्वाच्या 12 प्रकल्पांना केंद्र सरकारचे सहकार्य मागितले.

सतीशन म्हणाले, 'मिशन ओशन' प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विझिनजाम बंदराला देशातील एक प्रमुख सागरी व्यापार केंद्र बनवण्यासोबतच, जहाजबांधणी, जहाजांची देखभाल-दुरुस्ती, हरित इंधन निर्मिती, लॉजिस्टिक पार्क्स, बंदराभिमुख उद्योग, रस्ते-रेल्वे विकास आणि विमानतळ विकास अशा १२ महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्राकडे सहकार्य मागितले.

१,०३,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी मिळावी आणि विविध केंद्रीय योजनांमध्ये केरळचा योग्य विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली. याव्यतिरिक्त, जीडीपी गणनेतील त्रुटी दूर करणे, अतिरिक्त वीजपुरवठा मिळणे, वीज क्षेत्रासाठी कर्जविषयक सवलती पुन्हा बहाल करणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्रीय मदत वेळेवर उपलब्ध करून देणे यांसारख्या गरजाही मांडण्यात आल्या.

राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना टोला

चीनमध्ये एका शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग एकत्र आले आहे. हे तिन्ही नेते एका टेबलावर बसलेला फोटो राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, जर काँग्रेस सत्तेत असती तर भारताचा पंतप्रधान या टेबलावर बसलेला असता. काॅम्प्रमाईज पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT