Sachin Pilot, Ashok Gehlot Sarkarnama
देश

Congress Crisis News : गेहलोतांनीच दिले पायलट यांच्या फोन टॅपिंगचे आदेश; माजी ओएसडीचा बॉम्ब

Rajanand More

Rajasthan News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राजस्थान काँग्रेसमधील वाद (Congress Crisis News) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माजी ओएसडी लोकश शर्मा यांनी या वादाला फोडणी देण्याचे काम केले आहे. 2020 मध्ये काँगेसमधील अंतर्गत वादादरम्यान गेहलोत यांनीच सचिन पायलट यांच्यासह इतर काही आमदारांचे फोन टॅपिंग करण्याच आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा शर्मा यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan) उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधीच शर्मा यांनी गेहलोत (Ashok gehlot) आणि पायलट यांच्यातील वाद पुन्हा उकरून काढला आहे. 2020 मध्ये गेहलोत मुख्यमंत्री असताना पायलट (Sachin Pilot) व त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी गेहलोत यांनी फोन कॉल रेकॉर्डिंग देत ते माध्यमांना देण्यास सांगितले होते, असा दावा शर्मा यांनी केला आहे.

गेहलोत यांच्या कार्यालयाकडून शर्मा (Lokesh Sharma) यांचा दावा फेटाळण्यात आला आहे. तर पायलट यांच्या गोटातूनही आपण काँग्रेससोबत असल्याचे सांगत भाजपसोबत कधीही जाणार नाही, असे स्पष्ट केले जात आहे. मात्र, शर्मा यांच्या दाव्यामुळे ऐन निवडणुकीत दोन्ही नेत्यांमधील वादात ठिणगी पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सचिन पायलट आणि इतर आमदारांना सोबत घेत गेहलोत सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यामागे होते. यामागे भाजपच (BJP) असल्याचे गेहलोत यांना सिध्द करायचे होते, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

सचिन पायलट यांनी वारंवार सांगूनही त्यांचे ऐकले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर आमदारांसोबत हायकमांडची भेट घेतली. पण याची माहिती अशोक गेहलोत यांना समजल्यानंतर पायलट यांच्यासह इतरांचे फोन टॅपिंग करण्यास सुरूवात केली होती. सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते, असेही शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, फोन टॅपिंगबाबत शेखावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्लीत मार्च 2021 मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामध्ये शर्मा यांचेही नाव आहे. त्यांची याप्रकरणी चौकशीही झाली होती. आता पुन्हा एकदा निवडणुकीतदरम्यान हा मुद्दा चर्चेत आल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT