PM Narendra Modi News : मोदींसारख्या नेत्याची अमेरिकेतही गरज! बड्या कंपनीचे अध्यक्ष पंतप्रधानांवर भलतेच खूष

Jamie Dimon News : जेमी डिमन यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी भारतात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. मोदींनी देशात अविश्वसनीय काम केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
PM Narendra Modi, Jamie Dimon
PM Narendra Modi, Jamie DimonSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जगातील दिग्गज कंपनी जेपी मॉर्गन चेज कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ जेमी डिमन हे पंतप्रधानांच्या कामावर भलतेच खूष आहेत. त्यांनी आजत मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदींनी भारतात अविश्वसनीय काम केल्याचे म्हटले आहे.

इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्कतर्फे आयोजित एका कार्यक्रमात जेमी डिमन (Jamie Dimon) यांनी मोदींची प्रशंसा केली आहे. भारतातील गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रशासनातील सुधारणांवर डिमन यांनी प्रकाश टाकला. तसेच मोदींच्या नेतृत्वात भारताने (India) केलेल्या प्रगतीवरही त्यांनी जोर दिला. अमेरिकेलाही मोदींसारख्या नेत्यांची गरज असल्याचे विधानही डिमन यांनी केले आहे.

PM Narendra Modi, Jamie Dimon
Lok Sabha Election 2024 : अखेर अखिलेश यादवही लोकसभेच्या रिंगणात; लालूंच्या जावयाचा पत्ता कट

पंतप्रधान मोदींच्या धोरणामुले 400 मिलियन लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सरकारने जवळपास 700 मिलियन लोकांची बँक खाती उघडली. निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे. देशाची शिक्षण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासात अविश्वसनीय काम केले आहे, असे कौतुक डिमन यांनी केले आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक न्यायप्रिय आणि त्यासाठी आग्रही असलेल्या व्यक्तीमुळे देश प्रगतिपथावर आहे, भारतात 29 राज्ये आहेत. पण ती सर्व राज्य स्वयंपूर्ण आहेत. राज्यांमधील कर प्रणालीतील असमानता दूर करून मोदी सरकारने यातील भ्रष्टाचार संपवला आहे, असेही डिमन यांनी म्हटले आहे.

R

PM Narendra Modi, Jamie Dimon
Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितले सरकार आल्यावर कसे 'ठका ठक, ठका ठक....' पैसे टाकणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com