Congress
Congress  Sarkarnama
देश

Congress : काँग्रेसचं ठरलं! विधानसभा उमेदवारांची पहिली यादी १५ दिवसांत जाहीर करणार

सरकारनामा ब्यूरो

Belgaum News : देशात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवरच अनेक नेत्यांनी सभा घेण्यास आणि राज्यात दौरे करण्यास सुरवात केली आहे. तर कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीही राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाने तर कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पहिली उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येईल, असं सांगितलं आहे. कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या १५ दिवसांत काँग्रेस पक्षाची पहिली उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे कर्नाटक प्रदेश निरीक्षक रणदीपसिंग सुरजेवाला यांनी आज (ता.१९) काँग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेत दिली.

सुरजेवाला म्हणाले, ''राज्यात सर्व २२४ जागा काँग्रेस लढविणार आहे. त्यासाठी उमेदवारांची पहिली यादी येत्या १५ दिवसांत घोषित केली जाईल. यासंदर्भातील अर्जांची पडताळणी झाली आहे. तसेच घरोघरी जाऊन काँग्रेसतर्फे गृहज्योती, गृहलक्ष्मी योजनेबाबतची माहिती देण्यात येईल. पुढील १० दिवस कार्यक्रम चालणार आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

''काँग्रेसच्या महत्वकांक्षी योजनेमुळे भाजपात खळबळ उडाली आहे. पराभवाची भिती वाढली आहे. त्यामुळेच मंत्री अश्वत्थ नारायण यांनी सिध्दरामय्या यांना जिवे मारण्याचे धमकी दिली आहे. भाजप आमदार खरेदी करत आहे.

मात्र, काँग्रेस पारदर्शक निधी गोळा करत आहे. भाजप पक्षाचे बोम्मई सरकारचा उदय चाळीस टक्के कमिशन गोळा करण्यासाठी झाला आहे'', अशी घणाघाती टीका भाजपवर केली.

काँग्रेसच्या महत्वकांक्षी व लोकप्रिय विविध घोषणांमुळे भाजपची कोंडी झाली असून, काँग्रेसच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप हतबल झाल्याचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी बेळगाव व चिक्कोडी येथील सभेत केले.

काँग्रेसच्या हमीपत्रामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरु आहे. राज्यात भ्रष्ट भाजप सरकार आहे. जनता कंटाळली आहे. प्रत्येक घराला दोनशे युनिट मोफत वीज, गृहिणींना दर महिन्याला दोन हजार आणि तांदूळ देण्याबाबतची घोषणा केल्याचे सुरजेवाला यांनी सभेमध्ये सांगितले.

दरम्यान, या वेळी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, काँग्रेस नेते सलीम अहमद, केपीसीसी उपाध्यक्ष अशोक पट्टण, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए.बी.पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, महावीर मोहिते, लक्ष्मण चिंगळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT