Chinchwad by election : आयटीयन्ससह उच्चशिक्षित तरुणवर्गाची मते मिळविण्यासाठी भाजपची ‘तेजस्वी’ खेळी

Tejasvi Surya : राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केलेले रस्ते हे पंतप्रधान मोदींनी तयार केलेले, भाजपच्या खासदार तेजस्वी सूर्यांचा दावा
Tejasvi Surya
Tejasvi Surya Sarkarnama

पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेले आयटीयन्ससह उच्चशिक्षित तरुणवर्गाची मते मिळविण्यासाठी पक्षाने आज पक्षाचे सर्वात तरुण, उच्चशिक्षित खासदार तेजस्वी सुर्या यांचा ‘युथ डॉयलॉग वुईथ तेजस्वी सूर्या’ हा कार्यक्रम केला. त्यात त्यांनी एक मत विकासाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी द्या, असे आवाहन चिंचवडकरांना केले.

राहुल गांधींनी ज्या रस्त्यांवरून भारत जोडो यात्रा केली, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केलेले आहेत, असा दावा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांनी यावेळी केला. जनतेला भाजपच विकास देऊ शकतो.

हे मोदींनी देशात, तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखवून दिले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत एक मत विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Tejasvi Surya
Harshvardhan Jadhav : मोर्चा काढण्यापेक्षा तिजोरीच्या चाव्या फिरवा, नुकसान भरपाईचे पैसे द्या..

यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते, प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शहराध्यक्ष संकेत चोंधे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

Tejasvi Surya
Shivsena News : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण गमावल्यांतर ठाकरे ॲक्शन मोडवर; मोठे राजकीय पाऊल उचलले

देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काम झाले, तेच काम दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झाले आहे. शहरातील प्रत्येक विकासात त्यांची छाप आहे.

त्यांच्या एका मतामुळेच राज्यात परत भाजपची सत्ता आली. त्यांचे ऋण परत देण्याची संधी आपल्यासमोर आहे, असे सुर्या म्हणाले. मतदारांनी घराबाहेर पडून एक मत चिंचवडच्या विकासासाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com