Congress News Sarkarnama
देश

Congress News: काँग्रेसची पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा; स्क्रिनिंग कमिट्यांच्या नियुक्त्या, सतेज पाटलांवर जबाबदारी

Congress Political News: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांसाठी स्क्रीनिंग कमिट्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार,सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

Deepak Kulkarni

New Delhi News: पुढील वर्षी देशातील उत्तर प्रदेश, गोवा,पंजाब,उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षानं सोमवारी(ता.16 नोव्हेंबर) पाच राज्यांसाठी स्क्रिनिंग कमिट्यांची घोषणा केली आहे. या नियुक्त्यांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा,पंजाब या राज्यांच्या जबाबदारीची सर्वाधिक चर्चा होत आहे.

काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अजय माकन यांच्याकडे उत्तर प्रदेश स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्षपद सोपवले आहे. गोव्यात के. जे. जॉर्ज यांच्याकडे कमान असणार असून त्यांच्या टीममध्ये गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला घाम फोडणाऱ्या सतेज पाटलांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि उत्तराखंडमध्ये दीपा दासमुन्शी हे काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीचं नेतृत्व करणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांसाठी स्क्रीनिंग कमिट्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार,सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीमध्ये अध्यक्षांसह दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीकडे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची छाननी करणे आणि उमेदवार निवडताना पक्षनेतृत्वाला मदत करणे, ही या समित्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

उत्तर प्रदेश (यूपी) हे भारतीय राजकारणात लोकसभा निवडणुकांची 'लिटमस टेस्ट' मानले जाते. 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील संघटनात्मक आणि निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने ज्येष्ठ नेते अजय माकन यांची उत्तर प्रदेश स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह अस्लम शेख आणि बी.व्ही.श्रीनिवास यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी दीपा दासमुंशी यांची स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या समितीत अनिल चौधरी आणि पाल भाई अंबालिया यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ.सिरिवेल्ला प्रसाद यांची स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या समितीमध्ये सचिन सावंत आणि निवेदिथ अल्वा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने के. जे. जॉर्ज यांची स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या समितीमध्ये सतेज डी. पाटील आणि शफी परंबिल यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बी. एम. संदीप यांची स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये हिबी ईडन आणि राजेश ठाकूर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मणिपूरमधील राजकीय परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT