RBI News : रिझर्व्ह बँकेचा 63 फायनान्स कंपन्यांना दणका; थेट परवानाच रद्द, महाराष्ट्रातील कंपन्यांचाही समावेश

RBI Licence Cancellation, RBI NBFC Action, NBFC Licence Cancelled : नोंदणी रद्द करण्यात आलेल्या एकूण ६३ फायनान्स कंपन्यांमध्ये महाराष्ट्र नोंदणी झालेल्या तीन कंपन्यांचा समावेश आहे.
RBI cancels registration certificates of 63 finance companies, including three Maharashtra-based NBFCs.
RBI cancels registration certificates of 63 finance companies, including three Maharashtra-based NBFCs.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Reserve Bank of India update : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील ४९ नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांचा (NBFCs) परवाना रद्द केल्याची माहिती दिली आहे. तर १३ NBFCs आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने नोंदणी प्रमाणपत्र सरेंडर केले आहे. कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश १ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीतील आहेत.

रिझर्व्ह बँकेने सोमवारी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. बँकेने एकूण ६३ वित्तीय संस्थांविरुद्ध ही कारवाई केली आहे. बँकेने म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४' च्या कलम ४५-आयए (६) अंतर्गत ४९ NBFCs चे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

देशातील १३ NBFCs आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने स्वतःहून नोंदणी प्रमाणपत्रे परत केल्यानंतर त्यांची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. 'भारतीय रिझर्व्ह बँक कायदा' आणि 'नॅशनल हाऊसिंग बँक कायदा, १९८७' मधील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

RBI cancels registration certificates of 63 finance companies, including three Maharashtra-based NBFCs.
Latur DCC Bank : जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता काबीज केलेल्या देशमुखांना भाजपचा असाही धक्का; निलंगेकरांनी हिसका दाखवलाच...

नोंदणी रद्द करण्यात आलेल्या एकूण ६३ फायनान्स कंपन्यांमध्ये महाराष्ट्र नोंदणी झालेल्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. मुंबईतील माहिम येथे नोंदणी झालेल्या अहा होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा परवाना ६ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आला आहे. तर मुलुंड येथील क्लुग इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ३० ऑक्टोबर रोजी आणि मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील राईट ट्रेझर फायनान्स अॅन्ड लिझनिंग कंपनीची नोंदणी २१ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

RBI cancels registration certificates of 63 finance companies, including three Maharashtra-based NBFCs.
Ajit Pawar Plane Crash : CM फडणवीसांनी शहांसमोर काढला अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा; सुनेत्रा पवार, शिंदेसमोरच मनातलं सांगितलं...

अन्य फायनान्स कंपन्यांमधील बहुतेक कंपन्या या पश्चिम बंगालमधील आहेत. काही कंपन्या नवी दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा आदी राज्यांतील आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, नोंदणी रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांना आता 'भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४' च्या कलम ४५-आय (a) मध्ये परिभाषित केल्यानुसार, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेचा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.