Congress Politics News : काँग्रेसच्या आसाम युनिटने या वर्षी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होण्याच्या आरोपाखाली तीन आमदार आणि पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांसह पाच वरिष्ठ सदस्यांना शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.
एका निवेदनाद्वारे काँग्रेसच्यावतीने(Congress) सांगण्यात आले आहे की, पक्षाच्या शिस्तपालन समितीने ही नोटीस जारी केली आहे, ज्यामध्ये संबंधितांना उत्तर दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला गेला आहे.
पक्षाच्या ज्या नेत्यांना नोटीस पाठवली गेली आहे, त्यामध्ये आमदार अब्दुर राशिद मंडल, रेकीबुद्दीन अहमद आणि भरतचंद्र नाराह यांचा समावेश आहे. तसेच, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा मीरा बडठाकुर आणि हाइलाकांडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शम्सुद्दीन बरलास्कर यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.
पक्षाने म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक काळातील हालचालींबाबत स्थानिक स्तरावरील पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांसोबत अनेकदा चर्चा केली गेली, विचारपूस केली गेली.
तसेच विविध भागांमधून आणि निवडणूक लढलेल्या उमेदवारांकडून डीएसीला एकूण ५६ तक्रारी प्राप्त झाल्या. यावर डीएसीने सखोल विचार करून आणि चर्चेनंतर पक्षाची शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधितांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला गेला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.