Rekha Gupta, Alka Lamba Sarkarnama
देश

Rekha Gupta oath Ceremony : काँग्रेसच्या नेत्यानं रेखा गुप्ता यांच्यासोबत घेतली होती शपथ! फोटो होतोय व्हायरल...

Delhi Chief Minister Congress leader Alka Lamba post : काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी रेखा गुप्ता यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

Rajanand More

New Delhi News : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्यांच्यासोबत काँग्रेसच्या एक महिला नेत्याही शपथ घेताना दिसत आहेत. या नेत्यानेच राजकारण बाजूला ठेवत हा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी राजकीय शत्रुत्व बाजूला सारत जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट सोशल मीडियात केली आहे. त्यांच्या या कृतीचे कौतुकही होत आहे. त्यांनी गुप्ता यांच्यासोबतचा 1995 मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या दोघी एकत्र शपथ घेताना दिसत आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत दोघीही त्यावेळी विजयी झाल्या होत्या.

अलका लांबा या त्यावेळी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियामध्ये तर रेखा गुप्ता या एबीव्हीपीमध्ये होत्या. लांबा यांनी त्यावेळी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची तर गुप्ता यांनी सरचिटणीस पदाची शपथ घेतली होती. हीच आठवण लांबा यांनी गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर झाल्यानंतर सांगितली आहे.

लांबा यांनी म्हटले आहे की, 1995 चा हा फोटो. मी आणि रेखा गुप्ता यांनी एकत्र शपथ घेतली होती. मी एनएसयूआयमध्ये असताना विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. तर रेखा यांनी महासचिव झाल्या होत्या. रेखा गुप्ता यांना शुभेच्छा. दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हाला आशा आहे की, यमूना स्वच्छ होईल आणि मुली सुरक्षित होतील, असे लांबा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रेखा गुप्ता यांच्याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यामध्ये सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 15 वर्षे दीक्षित यांनी दिल्लीत सत्ता गाजवली. आता गुप्ता यांना पाच वर्षांचा कालावधी मिळाला आहे. त्या भाजपच्या चौथ्य मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी पाच वर्षांतच भाजपचे तीन मुख्यमंत्री होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT