Parvesh Verma : मुख्यमंत्रिपदाचा पत्ता कट; भाजप नेत्याच्या निवासस्थानाबाहेर 'सन्नाटा'

CM Post Denied Parvesh Verma Residence Silence Outside: त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असते, पण रेखा गुप्ता यांचे नाव फायनल झाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
Delhi CM Selection 2025
Delhi CM Selection 2025Sarkarnama
Published on
Updated on

Parvesh Verma News: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांनी निवड झाली असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली आहे. वर्मा यांच्यासह सहा जण आज गुप्ता यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. लवकरच या शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होत आहे. त्यापूर्वी प्रवेश वर्मा यांच्या घरासमोरील काही फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. पण बुधवारी झालेल्या बैठकीत रेखा गु्प्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचा प्रत्यय आज आला.

सुरवातीपासून मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले प्रवेश शर्मा अचानक मागे पडले अन् रेखा गुप्ता यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे नेहमीच प्रवेश शर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असते, पण रेखा गुप्ता यांचे नाव फायनल झाल्याने वर्मा यांच्या कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Delhi CM Selection 2025
Delhi CM Rekha Gupta: दोन वेळा पराभूत, पहिल्यांदाच आमदार, RSSकडून शिफारस; CM रेखा गुप्ता यांची इनसाईट स्टोरी

आज सकाळी वर्मा यांच्या निवासस्थानी भाजपचे दोन-तीन नेते, काही कार्यकर्ते आले होते. पण त्यांचा प्रवेश वर्मा यांच्याशी संपर्क झाला नाही, वर्मा यांच्या निवासस्थानाचे गेट बंद असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा पत्ता कट झाल्यानंतर प्रवेश वर्मा हे पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा शपथ विधी सोहळा होत आहे. उपराज्यपाल व्हीके सक्सेना रेखा गुप्ता यांच्यासह सहा जणांना मंत्रिपदाची शपथ देणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डी आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंदर इंद्राज सिंह, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंह हे यावेळी शपथ घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com