Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi in Manipur : लोकसभेतील गदारोळानंतर राहुल गांधी थेट मणिपूर गाठणार

Lok Sabha session Congress Manipur on Fire : लोकसभा अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मणिपूरच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी केली होती.

Rajanand More

New Delhi : लोकसभा अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही त्यात सहभागी झाले होते.

लोकसभेनंतर आता राहुल गांधी थेट मणिपूर गाठणार आहे. ते सोमवारी मणिपूरमधील काही भागांत जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहे. मणिपूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. मेघचंद्र यांनी याबाबत माहिती दिली. राहुल दिल्लीतून विमानाने सिलचर येथे जाणार असून तिथून जिरीबाम जिल्ह्यात पोहचतील.

जिरीबाम जिल्ह्यात सहा जूनला हिंसा झाली आहे. मणिपूरमधील हिंसेच्या घटनेनंतर राहुल गांधी यांचा हा तिसरा दौरा असेल. मागील वर्षी मे महिन्यात हिंसा सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी ते राज्यात आले होते. तर यावर्षीच्या सुरूवातीलाच त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू झाली होती.

राहुल गांधी तिसऱ्या दौऱ्यात काही मदत शिबीरांना भेटी देणार आहेत. राज्यपाल अनुसुया उइके यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत मणिपूरच्या खासदारांना आपले म्हणणे मांडू दिले नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर स्वत: राहुल गांधी मणिपूरच्या दौऱ्यावर जात असल्याने राजकीयदृष्ट्या हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.  

मणिपूरच्या हिंसेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही राज्यात गेले नाहीत. निवडणूक काळात प्रचारासाठीही त्यांनी मणिपूरचा दौरा केला नाही. त्यावरून विरोधकाकंडून सातत्याने त्यांच्यावर निशाणा साधला जातो. निवडणूक प्रचारासह अधिवेशनादरम्यान बहुतेक नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करून मोदींना घेरलं होतं.

दरम्यान, राज्यसभेत मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करत काँग्रेसला फटकारलं होतं. मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे सांगत सरकार त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं होतं. तसेच काँग्रेस सत्तेत असताना मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलं होतं.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT