Mahua Moitra : त्या बॉसचा पायजमा..! महुआ मोइत्रा यांना वक्तव्य भोवलं; दिल्लीत गुन्हा दाखल

TMC MP Cash For Query Case Rekha Sharma : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी महुआ मोइत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mahua Moitra, Rekha Sharma
Mahua Moitra, Rekha SharmaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील आठवड्यात लोकसभेत तडाखेबंद भाषण ठोकत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार महुआ मोइत्रा अडचणीत आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी तक्रार दिली होती.

पैशांच्या बदल्यात प्रश्न प्रकरणात महुआ यांची खासदारकी मागच्यावर्षी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच त्या पुन्हा पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. लोकसभेत मागील आठवड्यात त्यांनी पहिलं आक्रमक भाषण केलं. आता त्या पुन्हा अडचणीत आल्या आहेत.

Mahua Moitra, Rekha Sharma
Constitution Article 361 : राज्यपालांकडून लैंगिक शोषण? कलम 361 नं वाचवलं, महिलेनं का दिलं सुप्रीम कोर्टात आव्हान?

काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी महुआ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शर्मा यांनी नुकतीच उत्तर प्रदेशातील हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांच्या एका व्हिडिओवरून महुआ यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं.

महिला आयोगाकडून महुआ यांच्या विधानाविरोधात शुक्रवारी दिल्ली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यातील कलम 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पत्र देण्यात आले असून महुआ यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Mahua Moitra, Rekha Sharma
Chandrababu Naidu : जिथं पक्षाची स्थापना, तिथंच चंद्राबाबूंची दयनीय स्थिती! पुन्हा भरला हुंकार...

दरम्यान, आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर महुआ यांनी आपल्याला अटक करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांना केले होते. दिल्ली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावी. मला तीन दिवसांत तातडीने अटक करायची असेल तर मी नादिया मध्ये आहे, अशी पोस्ट महुआ यांनी सोशल मीडियात केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com