G. Parmeshwar
G. Parmeshwar  Sarkarnama
देश

Karnataka Next CM : मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याची उडी : म्हणाले, ‘मी ५० आमदार घेऊन लॉबिंग करू शकतो...’

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात जोरदार लॉबिंग सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या वादात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. जी. परमेश्वर यांनीही उडी घेतली आहे. हायकमांडने सरकार चालवण्यास सांगितले, तर जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहेात, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Congress leader G. Parmeshwar's jump in the Chief Ministerial race)

माजी प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष परमेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘हायकमांडला माझ्या पक्षसेवेची जाणीव आहे. यासाठी आपल्याला लॉबिंग करण्याची आवश्यकता वाटत नाही. जवळपास ५० आमदार घेऊन लॉबिंग करु शकतो. पण, माझ्यासाठी पक्षाची शिस्त महत्त्वाची आहे. कर्नाटक (Karnataka) प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्षाची आठ वर्षे सेवा केली आहे. पक्षाला २०१३ मध्ये सत्तेत आणले. तसेच, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना सर्व काही माहीत आहे. मी शांत आहे. याचा अर्थ असा नाही की मी अक्षम आहे. मी सक्षम आहे आणि संधी मिळाली तर काम करेन.

काँग्रेसने १३५ जागा जिंकून सत्तेवर आल्यानंतर सरकारचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सध्या कर्नाटकात विचारला जात आहे. डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात तीव्र सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकार स्थापनेबाबत आणि मुख्यमंत्रिपदासाठी (Chief-Minister) पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीत आहेत.

एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-धजद युती सरकारच्या काळात परमेश्वर उपमुख्यमंत्री होते. ते सर्वाधिक काळ कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हेाते. परमेश्वर यांनी अॅडलेड विद्यापीठाच्या वेट अॅग्रीकल्चर रिसर्च सेंटरमधून वनस्पती शरीरशास्त्रात पीएच.डी. केली आहे. तुमकुरू जिल्ह्यातील कोरटगेरेचे प्रतिनिधित्व करणारे परमेश्वर २०१३ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हा ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, पण निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांची संधी हुकली होती.

पाच आश्‍वासनांसासाठी अटी?

निवडणुकीत पाच आश्‍वासने देणाऱ्या काँग्रेसने आता सूर बदलला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू असणार असल्याचेही संकेत परमेश्वर यांनी दिले आहेत. काँग्रेसने पहिल्याच मंत्रिमंडळात पाच योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT