Karnataka Next CM : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट : ‘लोकसभेला आमची मते हवी असतील, तर मुख्यमंत्री...’

एक काळ असा होता की लिंगायत समाजाची एकगठ्ठा मते भाजपकडे जायची. मात्र, या वेळी काँग्रेसच्या विजयात समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Karnataka Next CM
Karnataka Next CMSarkarnama

बंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाच्या या वादात कर्नाटकातील लिंगायत समाजानेही उडी घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा काँग्रेसला पाठिंबा हवा असेल तर मुख्यमंत्रिपदी वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून केली आहे. (Demand to give chance to Lingayat community as Chief Minister of Karnataka)

शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या वादात आणखी एका नव्या दावेदाराचे नाव समोर येत आहे. कर्नाटकातील (Karnataka) विविध जाती-समूहांतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) आपापल्या उमेदवारांची नावे दिली आहेत. कर्नाटकातील विजयात महत्त्वाची भूमिका, कशी बजावली याची आठवण करून दिली जात आहे.

Karnataka Next CM
Karnataka Next CM : डीके शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात हे आहेत प्रमुख तीन अडथळे!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून लिंगायत समाज चर्चेत आहे. आता लिंगायत समाजाचे (Lingayat community) प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय वीरशैव महासभेने काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी ३४ आमदार लिंगायत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे एक काळ असा होता की लिंगायत समाजाची एकगठ्ठा मते भाजपकडे जायची. मात्र, या वेळी काँग्रेसच्या विजयात समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Karnataka Next CM
Loksabha Election: महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेसाठी काँग्रेसने मांडला जागावाटपाचा ‘हा’ फॉर्म्युला

अखिल भारतीय वीरशैव महासभेने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लिंगायत समाजातील ४६ उमेदवार उभे केले होते आणि त्यातील ३४ उमदेवार विजयी झाले होते. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला समाजाचा पाठिंबा कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्याला संधी द्यावी, अशी आम्ही काँग्रेसला विनंती करतो, असे त्या पत्रात म्हटले आहे.

Karnataka Next CM
Karnataka Next CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री? : शुभेच्छा देत शिवकुमार म्हणाले ‘मी बंडखोर नाही अन्‌ ब्लॅकमेलही करत नाही’

अखिल भारतीय वीरशैव महासभा संघटनेच्या सदस्यांमध्ये प्रमुख लिंगायत नेते आहेत. त्याचे अध्यक्ष ९१ वर्षीय शमनुरु शिवशंकरप्पा आहेत. ते कर्नाटकचे सर्वात वयस्कर आमदार असून यावेळी ते दावणगेरे दक्षिणमधून विजयी झाले आहेत.

दलित मुख्यमंत्री झाला पाहिजे

लिंगायत समाजाबरोबरच दलित समाजही पुढे आला आहे. काँग्रेस नेते जी परमेश्वरा यांची मुख्यमंत्रीपदी निवड करावी, अशी मागणी दलित समाजाने केली आहे. इतकेच नाही तर तुमकूरमध्ये झालेल्या सभेत दलित नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यात यावे, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com