Padmaja Venugopal Sarkarnama
देश

Padmaja Venugopal: आणखी एका मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर भाजपचा डोळा; काँग्रेसला मोठा धक्का...

Mangesh Mahale

'फिर एक बार मोदी सरकार'म्हणत भाजपमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024 BJP Politics)जोरात तयारी सुरु केली आहे. भाजपने 'मिशन साऊथ'ला सुरुवात केल्याचे चित्र आहे. केरळमध्ये आणखी एका मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर भाजपचा डोळा आहे. ए. के. अँटनी यांचे चिंरजीव अनिल अँटनी यांच्यानंतर आता के करुणाकरण यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल (Padmaja Venugopal) या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. लवकरच त्यांचा प्रवेश भाजपमध्ये होईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

जर पद्मजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो काँग्रेसला दुसरा मोठा झटका ठरणार आहे. त्यांचे वडील के करुणाकरण चार वेळा केरळची मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.शिवाय ते केंद्रीय मंत्री राहिले आहेत.करुणाकरन हे अनुभवी नेते होते आणि त्यांचे समर्थक त्यांना 'चाणक्य' म्हणतात. त्यांचे चिरंजीव मुरलीधरन हे काँग्रेसचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप पद्मजा यांनी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहे. पद्मजा यांनी पक्षांतराच्या वृत्ताचे खंडन करणारी फेसबूक पोस्ट बुधवारी डिलीट केली आहे. त्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आणखी वाढली आहे.

भाजपने एप्रिल २०२३ मध्ये केरळचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांना भाजपने पक्षात घेतले. ए.के.अँटनी हे दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच ते काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य, आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. केरळमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची मोठी भूमिका होती. अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपने त्यांना पत्तनमथिट्टी मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे.

केरळ काँग्रेसचे माजी नेते पीसी जॉर्जसह त्यांचा मुलगा शॉन जॉर्ज यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, पद्मजा वेणुगोपाल यांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सातत्यानं होणाऱ्या उपेक्षेमुळं पद्मजा यांनी पक्ष सोडणार असल्याचे बोललं जात आहे. पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे. पद्मजा यांनी तीन वेळा विधानसभा व एक वेळा लोकसभा निवडणुक लढवली होती. पण त्यांच्या त्यात पराभव झाला. पद्मजा वेणुगोपाल या वडाकाराचे खासदार के. मुरलीधरन यांच्या बहीण आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी पद्मजा यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला.आगामी लोकसभा निवडणुकीत पद्मजा यांना केरळमधून भाजपाचं तिकीट दिलं जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. एर्नाकुलम किंवा चालकुडी मतदार संघातून भाजपा पद्मजा वेणुगोपाल यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT