MLA Yogesh Kadam:...तर मलाही नाईलाजाने पावलं उचलावी लागतील; आमदार कदमांनी भाजपला सुनावलं

kokan Politics: माझे कार्यकर्ते फोडून भाजपमध्ये घेतले जात असतील तर ते मला पटलेले नाही, असे परखड मत योगेश कदम यांनी व्यक्त केले.
MLA Yogesh Kadam
MLA Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri: ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावरच कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारीच्या जागावाटपावरून रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत, अशातच आता दापोलीचे आमदार योगेश कदम (Dapoli MLA Yogesh Kadam) यांनीही स्थानिक भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.

आपण महायुतीमध्ये समन्वय ठेवून काम करत असताना जर का आमचेच कार्यकर्ते भाजप फोडणार असेल तर मलाही नाईलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील, असा सज्जड इशाराच आमदार योगेश कदम यांनी दिला आहे. या वेळी महाविकास आघाडीचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे विद्यमान रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचीही आमदार योगेश कदम यांनी पाठराखण केली आहे. अशातच शनिवारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दापोली येथे जाहीर सभा होणार आहे, याकडेही आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमधील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी भाजपला इशारा दिल्याने आता महायुतीमधील समन्वयाचा अभाव व शिवसेना भाजपमधील शीतयुद्ध आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच समोर आले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप हा वाद समोर आला आहे. या वेळी रायगड लोकसभेत अनंत गीते यांनी दापोली मतदारसंघातून लीडचीच अपेक्षा सोडाच, पण महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी 55 ते 60 हजार मतांचं मताधिक्य मिळून तो विजयी होईल, असाही विश्वास आमदार योगेश कदम यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

ज्यावेळी आपण महायुतीमध्ये एकत्र काम करतोय चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय आणि जर का आमचेच कार्यकर्ते फोडायला लागले तर मग शेवटी नाईलाजाने मलादेखील काही पावलं उचलावी लागतील आणि म्हणूनच भाजपचे काही वरिष्ठ नेते आहेत मंत्री रवींद्र चव्हाण,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरदेखील मी या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करणार असल्याचे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दापोली येथे येऊन सभा घेतली याचे मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही, पण या कार्यक्रमात शिवसेनेबरोबर काम करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांचे प्रवेश घेतले गेले की जे आज माझ्यासोबत काम करीत आहेत, अशा गोष्टी नको व्हायला, असे कदम म्हणाले.

MLA Yogesh Kadam
kolhapur Politics: के.पी. नव्हे तर राष्ट्रवादीच्या लीडरवर ए. वाय. पाटलांचा वार, कागलमधूनचं...

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा उमेदवारी मागण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. उमेदवारी कोणाला मिळावी, कोणाला नको याबद्दल मी काही बोलू शकत नाही, परंतु आज महायुती आहे सन्माननीय सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. शक्यतो विद्यमान खासदाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं जाते असे आजवर घडत आले आहे. आजवर रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 30 वर्षे शिवसेनेचे खासदार होते. सुनील तटकरे हे गेल्या वेळेला निवडून आले आहेत. त्यामुळे रायगड रत्नागिरी लोकसभेत शिवसेना व राष्ट्रवादी हेच खासदार या ठिकाणी राहिले आहेत म्हणून तटकरे यांनी या मतदारसंघामधला दावा सोडलेला नसेल यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येऊन सभा घेतली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. याविषयी मी काही बोलणार नाही, पण माझे कार्यकर्ते फोडून भाजपमध्ये घेतले जाता असतील तर ते मला पटलेले नाही, असे परखड मत योगेश कदम यांनी व्यक्त केले.

आमदार योगेश कदम यांनी माजी खासदार अनंत गीते यांच्यावरही टीका केली. गीते यांनी आजवर केवळ कुणबी समाज याच नावावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी कोणताही विकास केला नाही. कोणालाही नोकरीलादेखील लावलं नाही, पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही त्यांच्यामार्फत एकही उद्योग रायगड लोकसभा मतदारसंघात आला नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून गीते यांना मिळालेला लीड हा आमदार योगेश कदममुळे मिळाला आहे, त्यांना जर का आता परत पडण्याची इच्छा असेल तर त्यांनी उभं राहावं, अशी टीका आमदार योगेश कदम यांनी केली आहे.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com