Congress leader Phoolchand Mulana passes away in Mohali hospital following kidney failure Sarkarnama
देश

मोठी बातमी: राजकीय वर्तुळात शोककळा! काँग्रेसचा 'चाणक्य' हरपला; 4 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याने घेतला अखेरचा श्वास

Congress leader passes away : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले फूलचंद मुलाना यांचे मोहालीतील रुग्णालयात निधन झाले. किडनी निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Rashmi Mane

हरियाणा : हरियाणाच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि हरियाणा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष चौधरी फूलचंद मुलाना यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाना यांनी शुक्रवारी मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हरियाणातील काँग्रेस पक्षात शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

फूलचंद मुलाना हे हरियाणाच्या राजकारणातील अनुभवी आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. अंबाला जिल्ह्यातील मुलाना विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तब्बल 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. 1972, 1982, 1991 आणि 2005 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

केवळ आमदार आणि मंत्री म्हणूनच नव्हे, तर पक्ष संघटनेतील योगदानामुळेही त्यांची वेगळी ओळख होती. हरियाणा प्रदेश काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांचे पुत्र वरुण मुलाना हे सध्या काँग्रेसचे खासदार आहेत. मुलाना यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुलाना यांच्या साध्या स्वभावाचा, मृदुभाषी व्यक्तिमत्त्वाचा आणि जनसेवेतील योगदानाचा उल्लेख करत सुरजेवाला यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नेत्याच्या निधनाने काँग्रेसने अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT