मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Yogi Adityanath mother passes away at 91 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक. त्यांच्या आईने वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जाणून घ्या निधनासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पंचूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सावित्री देवी या उत्तराखंडमधील पंचूर गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. रविवारी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशसह राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.