Priyanka Gandhi, Manikrao Thakre Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, 'यूपी'तून प्रियांका गांधींना डच्चू

Rajanand More

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणूक आणि तीन राज्यांतील दारूण पराभवानंतर काँग्रेसने मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याजागी अविनाश पांडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मीडियालाही ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी केले होते. पण या निवडणुकीत त्यांचा काहीच प्रभाव पडला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून या जबाबदारीतून मोकळे करण्यात आले आहे. तसेच इतर कोणतेही राज्य त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले नाही. अविनाश पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी असतील.

केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) हे महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) प्रभारी असतील. काँग्रेसचे याआधीचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. patil) हे कर्नाटकच्या मंत्रिमंडळात आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Assembly Election) महत्वाची जबाबदारी पार पाडलेले माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) यांना गोव्यासह दमण व दीव आणि दादरा व नगर हवेलीचे प्रभारी करण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे छत्तीसगडचे प्रभारी असतील. तर जितेंद्र सिंह हे आसाम आणि मध्य प्रदेश, रणदीप सिंग सुरजेवाला हे कर्नाटकचे, दीपक बाबारिया हे दिल्ली व हरयाणाचे, कुमारी सेलजा या उत्तराखंड, जी. ए. मीर हे झारखंड व पश्चिम बंगाल आणि दीपा दासमुन्शी यांच्याकडे केरळ, लक्षद्वीप आणि तेलंगणाच्या प्रभारी असतील.

बिहारची जबाबदारी मोहन प्रकाश यांच्याकडे देण्यात आली आहे. तर डॉ. चेलाकुमार हे मेघालय, मिझोरम व अरुणाचल प्रदेश, डॉ. अजोय कुमार हे ओडिशा, तमिळनाडू व पदुच्चेरीचे, भरतसिंह सोलंकी हे जम्मू व काश्मीरचे, राजीव शुक्ला हे हिमाचल प्रदेश व चंदीगडचे प्रभारी असतील. सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याकडे राजस्थान, देवेंदर यादव यांच्याकडे पंजाब, गिरीश चोडणकर यांच्याकडे त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालँडची जबाबदारी असेल. मणिकंम टागोर हे आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबारचे प्रभारी असतील.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT