Kalaben Delkar Meet Modi : ठाकरेंना मोठा धक्का; ज्यांच्यासाठी भाजपबरोबर पंगा घेतला तेच खासदार पक्ष सोडणार?

Shivsena News : त्यांनी मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख ‘अर्थपूर्ण भेट’ असा केला आहे
Kalaben Delkar Meet Narendra Modi
Kalaben Delkar Meet Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रान उठवून महाराष्ट्राबाहेर प्रथमच शिवसेनेचा खासदार निवडून आणणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन पटेल आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्या भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याला दुजोरा देताना ठाकरेंसोबत कोणीही उरणार नाही, असे विधान केले आहे. (Thackeray group MP Kalaben Delkar will join BJP?)

कलाबेन डेलकर यांचे पती आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठा वाद झाला होता. दीव दमणच्या प्रशासकावर डेलकर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेनेही भाजच्या विरोधात आरोपांची राळ उठवली होती. मोहन डेलकर हे सात वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kalaben Delkar Meet Narendra Modi
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांसह शिवसेनेने केली होती. डेलकर यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या दादरा नगर हवेलीच्या जागेवर कलाबेन डेलकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. डेलकर यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला होता. डेलकर यांच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपला अंगावर घेतले होते.

महाराष्ट्राच्या बाहेर प्रथमच निवडून आलेल्या शिवसेनेच्या खासदार कलाबेन डेलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या भेटीची माहिती कलाबेन यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. त्यांनी मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख ‘अर्थपूर्ण भेट’ असा केला आहे, त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.

Kalaben Delkar Meet Narendra Modi
Maratha Reservation : मुंबईत 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण; मनोज जरांगेंनी पुन्हा रणशिंंग फुंकले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदार कलाबेन डेलकर, त्यांचे सुपुत्र अभिनव डेलकर आणि मुलगी दिविता डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत दादरा नगर हवेलीमधील जनतेच्या प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा केली. मोदी यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ देत दादरा नगर हवेलीचे प्रश्न समजून घेतले. चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नांवर आपण गंभीर असून विकासाच्या मुद्यावर आपण दादरा नगर हवेलीतील जनतेच्या सोबत आहोत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे, असे अभिनव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kalaben Delkar Meet Narendra Modi
Yugendra Pawar ‘अजितदादा अन्‌ पवारसाहेब दोघेही माझेच; मी कशाला एक भूमिका घेऊ’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com