NCP News: राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. तर अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावरच दावा केला. त्यामुळे राष्ट्रवादीत जोरदार हालचाली वाढल्या आहेत.
या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षात घडलेल्या सर्व घडामोडीसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ही बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटीला आले आहेत.
आता शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांच्या गटाने दावा केल्यानंतर राहुल गांधी आणि शरद पवार यांची ही भेट होत आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंचे निलबंन
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि एस.आर.कोहली यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मीच आहे, असंही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "कोणी कोणाची नियुक्ती केली हे महत्वाचे नाही. कारण मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे", असं स्पष्ट करत "वेळ येईल तेव्हा, बहुमत कुणाकडे आहे ते दाखवू", असा थेट इशाराही यावेळी पवारांनी दिला आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.