Sharad Pawar Meeting in Delhi: प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षात घडलेल्या सर्व घडामोडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
NCP News
NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. यानंतर अजित पवार यांनी थेट पक्ष आणि पक्ष चिन्हावरच दावा केला.

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक बोलावली होती. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षात घडलेल्या सर्व घडामोडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि एस. आर. कोहली यांचे पक्षातून निलबंन करण्यात आले आहे.

NCP News
Kolhapur Politics: भाजपसोबत सत्तेत जाऊनही हसन मुश्रीफांची झाली अडचण; समरजितसिंह घाटगेंनी वाढवले टेन्शन

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि एस. आर. कोहली यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. तसेच शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा पूर्ण विश्वास असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आठ ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या नावावरच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केलं. याबरोबरच भाजपबरोबर सत्तेत सामिल झालेल्या महाराष्ट्रातील नऊ आमदारांनाही पक्षातून निलंबित करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत दिली.

NCP News
Ajit Pawar News : उपराजधानीत आता होणार राष्ट्रवादी ‘पॉवरफुल्ल’, `या’ नेत्याने कसली कंबर…

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की, "आज झालेली आमची बैठक आमचं मनोधैर्य उंचावणारी होती. मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तसेच मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. माझं वय 82 असेल किंवा 92 असेल. यापुढेही आमचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com