Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : मुंबईत चेंगराचेंगरी अन् राहुल गांधींना झाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आठवण...

Mumbai Stampede Shivaji Maharaj Statue : मुंबईत रविवारी वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांची अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

Rajanand More

New Delhi News : दिवाळीमुळे मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा रेल्वे स्थानकांवर वाढला आहे. पण नियोजनाच्या अभावामुळे रविवारी वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जण जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर काँगेस नेते राहुल गांधी यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आठवण झाली.

राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करत चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, वांद्रे रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीची घटना देशातील अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या साखळीतील एक जाते उदाहरण आहे. मागील वर्षी जून महिन्यात बालासोर रेल्वे अपघातामध्ये 300 लोकांचा जीव गेला होता. पण पीडितांना भरपाई देण्याऐवजी भाजप सरकारने त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ नऊ महिन्यांत कोसळतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांचा हेतू केवळ प्रचार होता. यामध्ये शिवाजी महाराजांविषयी सन्मान नव्हता, ना जनतेच्या सुरक्षेची काळजी, असे राहुल यांनी म्हटले आहे.

उद्घाटन आणि प्रचार तेव्हाच चांगले असतात, जेव्हा त्यामागचा उद्देश जनतेची सेवा असेल. सार्वजनिक संपत्तीच्या देखभालीचा अभाव आणि दुर्लक्षामुळे लोकांचा जीव जाऊ लागला, पूल आणि प्लॅटफॉर्म किंवा पुतळे उदघाटनासोबतच पडू लागले तर हा गंभीर चिंतेचा मुद्दा आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

आज देशाला स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. व्यापार, प्रवास आणि लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या सुविधा हव्या आहेत. भारत सक्षम आहे, समर्थ आहे. आपल्याला केवळ जनसेवा हाच उद्देश असलेल्या प्रभावी आणि पारदर्शक व्यवस्थेची गरज आहे, असे ट्विट राहुल यांनी केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT