Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : IAS चे खासगीकरण..! UPSC च्या भरतीवरून राहुल गांधी भडकले

UPSC IAS NDA Government Narendra Modi : सहसचिव, उपसचिव आणि संचालक या पदांवर परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्त केली जाणार आहे.

Rajanand More

New Delhi : UPSC कडून 45 अधिकाऱ्यांच्या परीक्षेविना भरती करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावरून चांगलेच संतापले आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत हे IAS खासगीकरण असून युवकांच्या हक्कांवर दरोडा असल्याची टीका केली आहे.

केंद्र सरकारमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालक या पदांवर परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्त केली जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून त्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यामार्फत 45 पदांवर भरती होणार आहे. मोदी सरकारकडून यापूर्वीही अशी भरती करण्यात आली आहे. त्यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला आहे.

काय म्हटले आहे राहुल गांधींनी?

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लोकसेवकांची भरती करून संविधानावर हल्ला चढवत आहेत. विविध मंत्रालयातील महत्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून भरती करून उघडपणे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण ओरबाडून घेतले जात आहे.

उच्च पदांवर वंचितांचे प्रतिनिधित्व नसल्याचे मी नेहमी सांगतो. त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी लॅटरल एन्ट्रीद्वारे वंचितांना दूर केले जात आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या प्रतिभावंत युवकांच्या हक्कांवर दरोडा असून वंचितांच्या आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या कल्पनेला धक्का असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.

काही उद्योगपतींचे प्रतिनिधी निर्णायक सरकारी पदांवर बसून काय कारनामे करणार, याचे ज्वलंत उदाहरण सेबी आहे. इथे पहिल्यांदाच खासगी क्षेत्रातील व्यक्तीला अध्यक्ष बनवले. प्रशासकीय रचना आणि सामाजिक न्यायाला धक्का लावणाऱ्या या देशविरोधी निर्णयाला इंडिया आघाडीकडून कडाडून विरोध केला जाईल. ‘IAS चे खासगीकरण’ हे आरक्षण संपविण्याची मोदींची गॅरंटी आहे, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT