Champai Soren : भाजपमध्ये प्रवेश करणार? दिल्लीत येताच चंपई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

BJP Jharkhand Mukti Morcha JMM : चंपई सोरेन हे सहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Champai Soren, BJP
Champai Soren, BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या चर्चांना माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ते सहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दिल्लीत दाखल झाले आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे.

दिल्लीत येताच चंपई सोरेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझ्याविषयी जी चर्चा होत आहे, ती अजिबात खरी नाही. मी सध्या ज्या पक्षात आहे, तिथेच राहणार आहे. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो आहे. मला माझ्या मुलीला भेटायचे आहे. कोलकाता येथे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांना भेटल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले.

Champai Soren, BJP
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये? पक्षाने काढले पत्रक...

चंपई सोरेन हे केवळ पाच महिने झारखंडचे मुख्यंमत्री होते. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी या २ फेब्रुवारीला या पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच त्यांनी ३ जुलैला राजीनामा दिला होता. त्यावेळी पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती.

मागील दीड महिन्यांपासून चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे. भाजप नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्यांनंतर नाराजी व्यक्त करत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या कार्यकाळात जनता खूष होती, असे कौतुक केले जात आहे. त्यामुळे चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.

Champai Soren, BJP
Champai Soren : शिबू सोरेन यांच्या पक्षाला पडणार भगदाड; भाजपने लावली फिल्डिंग...

चंपई सोरेन हे केवळ एकटेच भाजपमध्ये प्रवेश कऱणार नाहीत, तर आणखी सहा आमदार त्यांच्यासोबत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. दिलीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, चंपई सोरेन यांनी त्यावर दिल्लीत आल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. पण असे असले तरी राजकारणात कधीही काही होऊ शकते. त्यामुळे झारखंडची विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत चंपई सोरेन हेमंत सोरेन यांची साथ देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com