Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: शासकीय निवासस्थान सोडताना राहुल गांधी भावूक; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Vacates Bungalow: लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.२२ एप्रिल) दिल्लीताल 12 तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थान सोडले आहे. यावेळी राहुल गांधी आपले शासकीय निवासस्थान सोडताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

आता राहुल गांधी यांचा मुक्काम काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ येथील निवासस्थानी असणार आहे. राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर लोकसभा हाऊसिंग पॅनलने त्यांना शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांनी सरकारी निवासस्थान सोडले.

मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे गुजरातमधील सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींना हे शासकीय निवासस्थान सोडवावे लागले आहे.

राहुल गांधी यांचे गेल्या काही वर्षापासून या घरात वास्तव्य होते. मात्र, खासदारकी गेल्यामुळे त्यांना हे घर रिकामं करण्याची नोटीस आली. त्यानंतर त्यांनी आज अखेर शासकीय निवासस्थान सोडले आहे. हे शासकीय निवासस्थान सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, ''सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे. मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

(Ediited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT