Warora APMC News : स्वगृही-वरोरा बाजार समितीत धानोरकरांच्या विरोधात उभा ठाकला कॉंग्रेसचाच एक गट !

Shivsena : या बाजार समितीवर बाळू धानोरकर यांनी भगवा फडकविला होता.
Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar, Warora APMC
Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar, Warora APMCSarkarnama

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. कारण कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या स्वगृही होणारी ही निवडणूक आहे. निवडणुकीची सूत्र स्वतः बाळू धानोरकर यांनी हाती घेतली आहे.

१८ संचालकांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहे. या बाजार समितीत विद्यमान आमदारांच्या गटांचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेत असताना या बाजार समितीवर बाळू धानोरकर यांनी भगवा फडकविला होता. त्यानंतर ते कॉंग्रेसवासी झाले. त्यांच्यासोबत अख्खे संचालक मंडळच कॉंग्रेसमध्ये गेले. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा एक गट मिळून धानोरकरांना येथे आव्हान देत आहे.

भद्रावतीत खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस मैदानात उतरली आहे. सोबतीला भाजपचा एक गट कॉंग्रेसच्या मदतीला आहे आहे. शिवसेनेने (ठाकरे) रवि शिंदे यांना जुन्या नवा सेना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन धानोरकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्रामपंचायत-आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून मोहन व्‍यंकटी भुक्या यांची अविरोध निवड झाली. १८ पैकी एक संचालक अविरोध निवडून आला. आता १७ संचालकांसाठी मतदान होईल. ३९ उमेदवार रिंगणात आहे.

चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता २६ उमेदवार रिंगणात आहे. १८ संचालकांपैकी राजेंद्र शंकर बावनकर यांची इतर मागासवर्गीय गटातून अविरोध निवड झाली. त्यामुळे आता १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुका घोषित होताच कॉंग्रेसचे सहकार क्षेत्रातील राजकारणी संजय डोंगरे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीला निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र निर्माण झाले.

Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar, Warora APMC
Saoner APMC News : केदारांच्या सावनेरात लढण्याची विरोधकांची हिंमतच झाली नाही !

गटबाजीने वज्रमूठ झाली सैल..

कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी वज्रमूठ बांधली. परंतु कॉंग्रेसच्या गटबाजीने वज्रमूठ सैल झाली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार गटातील दिवाकर निकुरे, गजानन बुटके यांच्या गटाने १३ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवसेनेचे प्रशांत कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद खिळखिळी झाली, असे दिसत आहे.

सिंदेवाहीत कॉंग्रेस विरूदध भाजप..

सिंदेवाहीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे पॅनल मैदानात उतरले आहे. येथे कॉंग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. १८ संचालकपदासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहे. ब्रह्रमपुरीत ३९ उमेदवार रिंगणात आहे. एक उमेदवार अविरोध निवडणूक आला. आता सतरा जागांसाठी मतदान होईल.

Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar, Warora APMC
Bhandara APMC Election : भंडाऱ्यात भाजपची पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती, फडणवीसांच्या ‘त्या’ वाक्याची झाली आठवण !

आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या विरोधात भाजपने (BJP) बहुजन वंचित आघाडी. (Vanchit Bahujan Aghadi) शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि भाकपला सोबत घेतले आहे. पोंभूर्णा येथे थेट भाजप -कॉंग्रेस समर्थीत आघाडीत लढत आहे. येथे १८ संचालकांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहे. मतमोजणी नंतर या युती- आघाड्या किती प्रभावी ठरल्या हे स्पष्ट होईल.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com