Sachin Pilot Latest Marathi News, Rajasthan political news in Marathi
Sachin Pilot Latest Marathi News, Rajasthan political news in Marathi Sarkarnama
देश

मुख्यमंत्री बदलणार? पायलट यांच्या हाती सूत्रे देण्याच्या हालचाली

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची जागा आता सचिन पायलट (Sachin Pilot) घेतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पायलट यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. तातडीनं नेतृत्व बदल करावा, असा आग्रह पायलट यांनी सोनिया गांधींकडे धरला आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, पंजाबची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राजस्थानमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (Sachin Pilot Latest Marathi News)

राजस्थानमध्ये डिसेंबर 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून चरणजीतसिंग चन्नी यांच्याकडे धुरा सोपवली होती. पंजाबमध्ये ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री बदलल्याचा फटका काँग्रेसला बसला होता. पंजाबमधील उदाहरणापूसन धडा देत राजस्थानमध्ये आताच पक्षाने निर्णय घ्यावा, असा पायलट यांचा आग्रह आहे. यासाठी पायलट यांच्या मागील आठवड्यात गांधी परिवारासोबत तीन बैठकी झाल्या आहेत.

पायलट यांनी 2020 मध्ये बंड पुकारले होते आणि ते मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांना काही आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांना सरकार आणि पक्षात अद्याप काही स्थान देण्यात आलेले नाही. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपद मागितले आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची मागील आठवड्यात भेट घेतली. पंजाबमधील पराभवानंतर पक्ष नेतृत्वाने राजस्थानमध्ये तातडीनं बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मागील दोन वर्षांत काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर गळती लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील पायलट हे एकमेव नेते आता उरले आहेत. जोतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि व्ही.पी.एन.सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पायलट यांनी थेटपणे गांधी कुटुंबासमोरच मुख्यमंत्रिपदाची मागणी ठेवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी 2018 मध्ये पक्षाला विजय मिळवून दिला होता. तरीही नेतृत्वाने अशोक गेहलोत यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली होती. पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी 2020 मध्ये बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT