Rahul Gandhi, Narendra Modi, Elon Musk Sarkarnama
देश

Rahul Gandhi on EVM : EVM जिवंतच! भारतच नव्हे अमेरिकेतही ‘दाल में कुछ काला है’…

Lok Sabha Election Result Mumbai Constituency EVM case Rahul Gandho Elon Musk : मुंबई पोलिसांनी वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडलीकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajanand More

New Delhi : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत वादात सापडली आहे. EVM 'ईव्हीएम' मशीनशी जोडलेला फोनच विजयी उमेदवार रविंद्र वायकरांच्या मेहुण्याला निवडणूक अधिकाऱ्यानेच वापरायला दिल्याचा दावा केला जात आहे.

यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच बरसले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतही ईव्हीएम छेडछाडीचा मुद्दा उपस्थित झाला असून टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनीच ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सत्तास्थापनेपुर्वी एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएम जिवंत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. इंडिया आघाडीला निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर एकाही नेत्याने ईव्हीएमवर भाष्य केले नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी हा टोला लगावला होता. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईतून ईव्हीएमबाबत मोठी बातमी समोर आली अन् पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

काय आहे प्रकरण?  

वायकरांचा केवळ 48 मतांनी विजय झाल्यानंतर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. यासंदर्भात पोलिसांनी वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडलीकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मतमोजणी दिवशी पंडलीकर हे मतमोजणी केंद्रात मोबाइलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा मोबाईल ईव्हीएमशी जोडलेला असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांकडून दोघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

राहुल गांधी बरसले

एलॉन मस्क यांनी एक्सवर ईव्हीएमबाबत केलेली पोस्ट आणि मुंबईतील प्रकाराचा संदर्भ देत म्हटले आहे की, भारतात ईव्हीएम ब्लॅक बॉक्स आहे, त्याचा तपास करण्याची परवानगी कुणालाही नाही. आमच्या निवडणुकीत प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. संस्थांमध्ये उत्तदायित्व राहत नाही, तेव्हा लोकशाही दिखावा बनते आणि धोक्याची शक्यता वाढते.

मस्कचा ईव्हीएमला विरोध

मस्क यांनी अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करू नये, असे म्हटले आहे. ईव्हीएमवर बंदी घालायला हवी. या मशीनला लोकांकडून किंवा एआयच्या माध्यमातून हॅक करण्याचा धोका आहे. हा धोका कमी असला तरी शक्यता खूप अधिक आहे, अशी भीती मस्क यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT