Video Ravindra Waikar VS Amol Kirtikar : रवींद्र वायकरांच्या मेहुण्यानं 'ईव्हीएम'शी...; धक्कादायक माहिती समोर

north west mumbai lok sabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर फेरमतमोजणीत वायकर हे 48 मतांनी विजयी झाले होते.
ravindra waikar
ravindra waikarsarkarnama

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ( north west mumbai lok sabha election ) शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. तरी मतमोजणीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडलीकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'ईव्हीएम' मशीनशी जोडलेला फोनच वायकरांचा मेहुणा पंडलीकरला दिनेश गुरवने वापरायला दिला होता. याप्रकरणी मेहुणा पंडलीकर आणि दिनेश गुरवला नोटिस पाठवत हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येणार आहे.

मतमोजणी दिवशी रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांचे मेहुणे पंडलीकर हे मतमोजणी केंद्रात मोबाइलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी वनराई पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती.

पण, शाहांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भरत शाहांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आलं आहे. यानंतर तपासात एक-एक सत्य समोर येत आहे.

निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यानेच 'ईव्हीएम' मशीनशी जोडलेला फोन वायकरांचा मेहुणा पंडलीकर याला वापरायला दिला होता. याच मोबाईवर आलेल्या ओटीपीनं 'ईव्हीएम' मशीन अनलॉक करण्यात आली होती, असं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी मोबाइल फोन जप्त करून 'एफएसएल'ला पाठवला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. त्यासह पंडलीकरांचा कोणाशी संवाद झाला, याचाही पोलिस तपास करणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पंडलीकर आणि दिशेन गुरव यांना 41 (अ) अंतर्गत नोटिस बजावत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ravindra waikar
Lok Sabah Election Result : ‘वायव्य मुंबई’ निकाल अपडेट; मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारी व्यक्ती निघाली वायकरांचा मेहुणा

उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठ्या नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्यांदा अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर फेरमतमोजणीत वायकर हे 48 मतांनी विजयी झाले होते. याविरोधात ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com