Vinesh Phogat, Shashi Tharoor Sarkarnama
देश

Shashi Tharoor : 'व्यवस्थेला कंटाळली, लढून-लढून थकली...', विनेश फोगटच्या निवृत्तीच्या घोषणेवर शशी थरूर यांची भावूक प्रतिक्रिया

Vinesh Phogat announced his retirement from wrestling: भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिनं कुस्तीला (Wrestling) अखेरचा रामराम केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपली कुस्तीक्षेत्रातील निवृत्ती घोषित केली आहे.

Jagdish Patil

Shashi Tharoor On Vinesh Phogat Retirement : भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिनं कुस्तीला (Wrestling) अखेरचा रामराम केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपली कुस्तीक्षेत्रातील निवृत्ती घोषित केली आहे.

तिच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय अनेक कुस्तीप्रेमींची निराशा देखील झाली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु असचानाच आता काँग्रेस (Congress) नेते शशी थरूर यांनी देखील विनेशच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे.

शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत विनेश फोगटच्या निवृत्तीच्या निर्णयावर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "ही मुलगी या व्यवस्थेला कंटाळली, ही मुलगी लढून-लढून थकली आहे." अशा दोन ओळीतच त्यांनी आपली मनातील भावना व्यक्त केली आहे.

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकची (Olympic) अंतिम फेरी गाठली.तिने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकानं जिंकला. तिच्या या विजयामुळे आता भारताच्या खात्यात सुवर्णपदक येणार याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या. शिवाय ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.

मात्र, या विजयाच्या दुसऱ्या दिवशीच संपूर्ण देशाला धक्का देणारी बातमी समोर आली, ती म्हणजे अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्यामुळे तिला सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. या बातमीमुळे आधीच निराश झालेले कुस्तीप्रेमी आणि भारतीय आता विनेश फोगटच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आणखीच निराश झाले आहेत.

तू हरली नाही, तर...

विनेशच्या निवृत्तीवर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं की, "विनेश, तू हरली नाही, तर तुला पराभूत केलं गेलयं, आमच्यासाठी तुम्ही नेहमीच विजेता राहशील, तू भारताची मुलगी आहेस. भारताचा अभिमान देखील आहे."

हा संपूर्ण देशाचा पराभव

त्याचवेळी रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीने विनेशच्या समर्थनार्थ म्हटलं की, "विनेश, तु हरली नाहीस, तर ती प्रत्येक मुलगी हरली आहे, जिच्यासाठी तू लढलीस आणि जिंकलीस. हा संपूर्ण देशाचा पराभव आहे. देश तुमच्या पाठीशी आहे. एक खेळाडू म्हणून तुझ्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT