Dr Satish Patil Politics: राष्ट्रवादी काँग्रेस जळगावमध्ये यंदा तरी भोपळा फोडणार का?

Jalgaon Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू.
Sharad Pawar & Satish Patil
Sharad Pawar & Satish PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नव्या दमाचे पदाधिकारी नेमले आहेत. मात्र हे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करतील का? हा महत्त्वाचा विषय आहे.

जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी सत्ता केंद्र भाजप आणि महायुतीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. या प्रस्थापित नेत्यांशी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला दोन हात करायचे आहेत.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या जिल्ह्यात एकही आमदार नाही. लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. या स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला महायुतीशी टक्कर द्यायची आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागावेत म्हणून पदाधिकारी झटत आहेत. पक्षाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खाते उघडण्यासाठी भाजपशी जोरदार टक्कर द्यावी लागेल. ही चिंता सध्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.

Sharad Pawar & Satish Patil
Ajit Pawar Vs Prajakt Tanpure : अजितदादांनी राहुरीत लक्ष घातलं; आमदार तनपुरेंचे टेन्शन वाढलं

पक्षाने नुकतेच शहराध्यक्षपदी एजाज मलिक, जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील आणि सहकार आघाडीचे अध्यक्ष वाल्मीक पाटील यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ११ पैकी दहा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन काम करावे.

आगामी ७० दिवसात प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्याने समन्वय निर्माण करावा. गावनिहाय आढावा घ्यावा. पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी दिल्या.

भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर केल्या आहेत. केवळ सत्ता टिकावी म्हणून त्यांचे हे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहता मतदार राज्यातील या सरकारला कंटाळले आहेत. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नव्हे तर भाजपच्या नेत्यांच्या दबावाखाली काम करीत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

Sharad Pawar & Satish Patil
Nashik Corruption: नाशिक महापालिकेत 300 कोटींचा घोटाळा? भाजप नेत्याचा बॉम्ब!

माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, अरुण पाटील, तिलोत्तमा पाटील यांसह विविध पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. एकंदरीतच जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विधानसभेत चांगले यश मिळावे यासाठी ही टीम कामाला लागली आहे. यंदा तरी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा भोपळा फुटेल का? ही चिंता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com