Narendra Modi, Sonia Gandhi Sarkarnama
देश

Sonia Gandhi : ...त्यांच्या अहंकारावर बोलायला शब्द नाहीत! सोनिया गांधी कडाडल्या

Rajanand More

Parliament Winter Session : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ घातल्याच्या कारणास्तव 141 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी मोदी सरकारने लोकशाहीची गळचेपी केली असून त्यांच्या अहंकारावर बोलायला शब्द नसल्याची टीका केली आहे.

काँग्रेसच्या (Congress) संसदीय दलाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, संसदेत योग्य मागणी करणाऱ्या सदस्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही लोकशाहीची गळचेपी आहे. अशाप्रकारे एवढ्या सदस्यांचे निलंबन यापूर्वी कधीही झाले नव्हते.

लोकसभेत 13 डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी निवेदन देण्याची विरोधी पक्षांतील सदस्यांनी मागणी आहे. दोन घुसखोरांनी लोकसभेच्या सुरक्षेचे उल्लंघन केले आहे. रंगीत धूर उडवला. त्यानंतरही विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा अहंकार असून त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी नाराजीही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, निलंबित झालेल्या खासदारांना संसदेच्या (Parliament) चेंबर, लॉबी आणि गॅलरीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका वकिलाने दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. घुसखोरीच्या घटनेवर अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. कामकाज सुरू होताच विरोधी बाकांवरील खासदारांकडून गोंधळ घात जात असल्याच्या कारणास्तव या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT