Parliament News: उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदारावर गुन्हा; निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबरमध्ये 'नो एन्ट्री'

Parliament Winter Session: संसदीय कामकाजात सहभागी होता येणार नाही
Parliament Winter Session 2023
Parliament Winter Session 2023Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi: संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून दोन्ही सभागृहांत झालेल्या गदारोळामुळे दोन दिवसांत एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या खासदारांना संसदेच्या (Parliament) चेंबर, लॉबी आणि गॅलरीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. संसदीय कामकाजात सहभागी होता येणार नाही, असा आदेश लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आला आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणे तृणमूल काँग्रेसच्या खासदाराला चांगलेच भोवले आहे.

निलंबित खासदारांनी मंगळवारी सकाळी संसद परिसरात एकत्रित येत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची मिमिक्री करताना दिसले.

Parliament Winter Session 2023
Congress News: कार्यकर्त्यांनो, सत्ता, पदे आम्ही उपभोगतो; बैठका तुम्ही करा...

धनखड यांनी राज्यसभेतील 46 खासदारांचे निलंबन केले आहे. यावेळी त्यांनी खासदारांचे कान टोचले होते. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी निलंबित करणाऱ्या खासदारांनी मंगळवारी संसदेच्या पायऱ्यांजवळ बसून निदर्शने केली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने केलेल्या वर्तनाचे चित्रिकरण काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईलमध्ये केले.

कल्याण बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल

जगदीप धनखड यांची नक्कल करणे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका वकिलाने दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर रोजी दोघांनी गॅलरीतून उडी घेत लोकसभेत घुसखोरी केली. त्यांनी स्मोक कॅंडल फेकले होते. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी आणि मंगळवारी वारंवार तहकूब करावे लागले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील एकूण 95 खासदारांना, तर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 46 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले.

Parliament Winter Session 2023
Nagpur News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'; तुपकरांचा हल्लाबोल, पोलिस अन् शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com